चुकिचे उदाहरण

शांतता  हा निव्वळ शब्द नाही. त्याला अर्थ आहे. शांतता म्हणजे आवाजाचे नसणे. इतके सोपे आहे. 
शांतता सिद्ध करता येते, डेसिबेल मीटर ने.  मीटर नसला तरी मी शांतता (म्हणजे आवाजाचे नसणे) अनुभवू शकतो. 
त्याच प्रमाणे शांतता नसणे (म्हणजे आवाज असणे) हे पण मी अनुभवू शकतो. 
म्हणून शांतता हे थोतांड नाही, निव्वळ तुमच्या कल्पनेचा आविष्कार नाही. 
शांतता म्हणजे काय हे नेमके माहीत असल्याने,  "शांतता एकमेव सत्य आहे, बाकी सर्व जग मिथ्या आहे" असले "ना शेंडा ना बुडखा" विचार कोणी मांडित नाही. 

मात्र तुम्हाला मी ब्रम्ह सिद्ध करण्याचे आव्हान दिले, ते माझे चुकलेच. अश्या करता, कि मुळात ब्रम्ह म्हणजे नेमके काय हेच अजून गुपीत असल्याने ते सिद्ध करण्याचे आव्हान प्री-मॅच्यूअर आहे. तर आधी, ब्रम्ह म्हणजे काय, ते सांगा. सिद्ध करण्याचे नंतर बघू. 

वर्णन नको. ते सार्वभौम आहे, ते अखंड आहे, वगैरे वर्णन झाले. वर्णन नको. ब्रम्ह म्हणजे काय, ते सांगा. 
(या वर्णना वर पण अनेक प्रश्न उपस्थित करता येतील. जसे, जर ब्रम्ह म्हणजे काय हेच तुम्हाला सांगता येत नाही, तर त्याचे वर्णन कसे करता येईल?)