डेसीबल मीटर ध्वनी मापक आहे. तो शांततेची व्यापकता दर्शवत  नाही. तुमच्या अल्पमतीला शांतता डेसीबल मीटरनं सिद्ध करता येते असं वाटत असलं तरी ती केवळ ध्वनी निर्माण झाला नाही म्हणून अस्तित्वात येत नाही; तर ती अनिर्मित आणि सार्वभौम आहे. शांतता जशी ध्वनी निर्माण होण्यापूर्वीची स्थिती आहे तद्वत ब्रह्म ही काहीही निर्माण होण्यापूर्वीची स्थिती आहे .

हरेक निर्मिती, स्थिती आणि विलय एका निर्मितीपूर्व स्थितीकडे निर्देश करते, ही स्थिती नाकारणं म्हणजे निर्मिती, तीचं चलन आणि लय या उघड गोष्टींच्या आत-बाहेर असलेली ती अचल, अनिर्मित आणि सार्वभौम स्थिती नाकारणं आहे.