शांतता जशी ध्वनी निर्माण होण्यापूर्वीची स्थिती आहे तद्वत ब्रह्म ही काहीही निर्माण होण्यापूर्वीची स्थिती आहे .
१- "काहीही निर्माण होण्यापूर्वी" नेमके काय होते, हे तुम्हाला (किंवा इतर कोणालाही) कस कळल? "ब्रम्ह" चे उरलेले भग्नावशेष (फोसिल्स) सापडले? किंवा इतर काही खुणा सापडल्या ?
२- बर, आता बरेच काही निर्माण झाले. आता त्या ब्रम्हची काय अवस्था आहे? जसे, ध्वनी निर्माण झाल्या नंतर शांतता संपते, तसेच (का तद्वत) बरेच काही निर्माण झाल्या नंतर ब्रम्ह पण संपले? का अजून पण आहे ? काही बदल तरी झाले, का होते तसेच आहे?
३- आणि संपले नसल्यास, अजून उरले असल्यास, आता तरी त्याच्या "असण्याच्या" काही तरी खुणा दाखवा.
पण यातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. शब्दांवर तुमची बऱ्या पैकी हुकुमत असल्याने शाब्दिक कसरती / खेळ करीत तुम्ही ही चर्चा लांबवू शकाल. पण ब्रम्ह म्हणून काही होते, व आहे, याचा कोणताही पुरावा तुम्ही देऊ शकत नाही. आणि तरी सुद्धा ते होते / आहे याचा हेका तर धरू शकताच, पण ते कसे आहे (सार्वभौम आहे, अखंड आहे) इत्यादी वर्णने पण करू शकता. सोपे आहे. कल्पनेच्या विश्वात बुड्या माराव्यात, व काहीही काढून दाखवावे.
ब्रम्ह्य ही पण कल्पनाच, आणि ते कसे आहे, ही पण कल्पनाच. ज्याला विश्वास ठेवायचा असेल त्याने ठेवावा.