पण ती कळणारा भाग्यवंत कोट्यवधीमध्ये एखादाच ! एखादा बुद्ध, कृष्ण,  अष्टावक्र, जनक, ओशो, निसर्गदत्त, एकहार्ट, ........ किंवा मी !  
ब्रह्म कळायला दोन गोष्टी हव्यात, संपन्नता आणि कमालीची आकलनक्षमता. संपन्नता अनेकांकडे असू शकते पण ब्रह्माचा उलगडा होण्यासाठी लागणारी आकलन क्षमता अत्यंत दुर्लभ; ती कशी ते तुमचा प्रातिनिधिक प्रतिसाद नेमकी दर्शवतो !

१) "ब्रम्ह" चे उरलेले भग्नावशेष (फोसिल्स) सापडले? किंवा इतर काही खुणा सापडल्या ?

याला म्हणतात अनाकलनाची परिसीमा ! पण त्याला नाईलाज आहे कारण बहुजनांची परिस्थिती अशीच आहे. काहीही समजलेलं नाही, दिलेला प्रतिसाद नीट वाचलेला नाही पण लिहिण्याची घाई कमालीची; पुन्हा वाचा > शब्दामुळे शांतता खंडीत झाल्याचा आभास होतो पण शांतता कायम अभंग आहे कारण ती निर्वस्तू आहे. तस्मात, शांततेचे  भग्नावशेष हा कमालीचा निर्बुद्ध कल्पनाविलास आहे !

२) बरं, आता बरेच काही निर्माण झाले. आता त्या ब्रम्हची काय अवस्था आहे? जसे, ध्वनी निर्माण झाल्या नंतर शांतता संपते, तसेच (का तद्वत) बरेच काही निर्माण झाल्या नंतर ब्रम्ह पण संपले?

एकदा गाडी हुकली की ती  कायमची हुकते, मूळ मुद्दाच न समजल्यानं पुन्हा तोच निर्बुद्ध कल्पनाविलास !

आणि संपले नसल्यास, अजून उरले असल्यास, आता तरी त्याच्या "असण्याच्या" काही तरी खुणा दाखवा.
 
ज्यात हे सारे विश्व प्रकट झाले आहे ते काय आहे ? ज्यात या सर्व सूर्यमालिका भ्रमण करतायत ते काय आहे ? ज्यात तुम्ही रात्रंदिवस चालताय, बोलताय, उठताय, निजताय, वावरताय ते काय आहे ? ते देहोत्पत्ती पूर्वी नसेल तर उत्पत्ती असंभव आहे, ते देहाच्या आरपार नसेल तर हालचाल असंभव आहे आणि देहाबरोबर ते नाश पावेल असं समजणं निव्वळ अज्ञान आहे कारण ते अनिर्मित आहे. 

अर्थात, ज्यांना असं वाटतं की असं काहीच नाही ते कायम अस्वस्थतेत जगतील कारण त्यांच्यासाठी देह हेच सर्वस्व आहे आणि देह नाशवंत आहे त्यामुळे देह जगवण्यात ते कायम एक व्यर्थ खटाटोप करत राहतील. त्यांना विदेहत्वाचं स्वास्थ्य त्यांना लाभणं शक्य नाही. त्यांच्यासाठी ब्रह्म हा शब्दांचा खेळ असेल त्यामुळे ते कायम शब्दद्वंद्वातच अडकून राहतील, त्यांना शांतता लाभणं असंभव आहे.