संजय
मला आकलनक्षमता नाही,  मला मुद्दाच समजला नाही, माझे प्रश्न निर्बुद्ध आहेत, मला जे काय समजत ते निव्वळ अज्ञान आहे, मी कायम शब्दद्वंद्वातच अडकलेला आहे, वगैरे वगैरे जे तुम्ही लिहिले, त्याचा मी अजिबात राग धरत नाही. कारण मला हे चांगले माहीत आहे, की हा तुमचा थयथयाट निव्वळ एक बुरखा (पांघरूण) आहे. आपली ज्या वर गाढ श्रद्धा - म्हणजे ब्रम्ह ही कल्पना - त्याला कोणी तरी आव्हान दिले. आता काय करायचे? तुमच्या जागी कोणी सूज्ञ व्यक्ती असती तर ती म्हणाली असती "हे बघा, केवळ ब्रम्हच नव्हे तर देव/ स्वर्ग/ नर्क/ चित्रगुप्त/ पुनर्जन्म/ . . . . या सर्व श्रद्धेच्या गोष्टी आहेत. त्यांचे "असणे" प्रत्यक्ष पणे तर नाहीच, अप्रत्यक्ष पणे पण दाखवून देता येत नाही. ज्याची श्रद्धा असेल त्याच्या करता हे सर्व आहे. ज्याची श्रद्धा नसेल, त्याच्या करता हे नाहीये." 

असे जर तुम्ही म्हंटले असते तर चर्चा तिथेच संपली असती. पण तुमचा इगो आड आला. कारण तुम्ही "मी एकटा परम ज्ञानी, इतर सर्व अज्ञानी" या पेडस्टल वर चढून बसलेले. स्वता:ला ". . . अष्टावक्र, जनक, ओशो, निसर्गदत्त, एकहार्ट, ........ किंवा मी !" यांच्या पंगतीला बसवणारे. ब्रम्ह ही केवळ श्रद्धा आहे असे मान्य करण्या करता आधी त्या पेडस्टल वरून खाली जमिनीवर उतरावे लागेल. ते तुम्ही कधीच करणार नाही. (एक वेळ बालाकोट हल्ला सफळ झाला असे कबूल कराल, पण पेडस्टल वरून खाली कधीच उतरणार नाही).

तार्किक उत्तर पण देता येत नाही, आणि "हे तर्काच्या पलीकडे आहे, फक्त श्रद्धा आहे" हे मान्य पण करवत नाही, ही कुचंबणा झाकण्या करता तुम्ही, प्रश्न विचारण्याला "आकलनक्षमता नाही,  त्याला मुद्दाच समजला नाही, त्याचे प्रश्न निर्बुद्ध आहेत,. . . . . " वगैरे बुरखा पांघरता. पण त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण बुरख्या पलीकडे काय आहे हे आम्हाला दिसते.

ओशो, निसर्गदत्त, एकहार्ट, ........ किंवा तुम्हाला म्हणे ब्रम्ह समजले. हे ओशो म्हणजे तेच ना, ज्यांनी "संभोगातून समाधी कडे" असे दिव्य ज्ञान जगाला दिले, त्यांच्या भक्तांना (त्यांना सर्वांना मां व स्वामी असे संबोधतात) "ती" खास समाधी प्राप्त करता यावी म्हणून जगभर खास आश्रम बांधले, 1000 कोटी येवढी संपत्ती, सगळ्यात महागड्या अश्या तब्बल 93 रोल्स-रोईस गाड्यांचा ताफा व इतर माया गोळा केली, . . . . आणि त्यांना म्हणे ब्रम्ह म्हणजे अंतिम सत्य समजले. हा !!  (एका गोष्टी करता मात्र  मी ओशोंना मानतो. स्वता:ला अत्यंत लॉजिकल, चिकित्सक असे समजणाऱ्या पाश्चात्यांना त्यांनी मस्त बेवकूफ बनवले)

तर, अश्या या ओशो पासून ते तुमच्या पर्यंत प्रत्येकाला ब्रम्ह समजले म्हणजे नक्की काय? तर प्रत्येकाने मला ते समजले असे डिक्लेयर केले. ज्याला विश्वास ठेवायचा असेल त्याने ठेवावा. ब्रम्ह ही पण श्रद्धाच, आणि अमक्या-तमक्याला ते समजले ही पण श्रद्धाच. मी जर असे म्हंटले की ब्रम्ह, त्या पलीकडे परब्रम्ह आणि त्याही पलीकडे एक नवीन ब्रम्ह मला सापडले आहे, "खरं -ब्रम्ह", आणि ते फक्त मलाच समजलेले आहे, तर तुम्ही मला खोटे / थापाड्या ठरवू शकता? अजिबात नाही. जर तुम्ही "खर-ब्रम्ह" असे काही नसतेच अशी भूमिका घेतली, तर मी तुम्हाला आकलनक्षमताच नाही,  तुम्हाला मुद्दाच समजला नाही, तुमचे प्रश्न निर्बुद्ध आहेत, तुम्हाला जे काय समजत ते निव्वळ अज्ञान आहे, वगैरे वगैरे बुरखा पांघरीन. बुरखे आम्हाला पण घेता येतात. नव्याने लिहिण्याची पण गरज नाही. तुमच्याच लिखाणातून कट-पेस्ट करायचे.