वाचता येत नाही, वाचतच नाही, का वाचलेलं समजत नाही ? तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं आहे; पुन्हा वाचा
 
१)  "ब्रम्ह" चे उरलेले भग्नावशेष (फोसिल्स) सापडले? किंवा इतर काही खुणा सापडल्या ? बरं, आता बरेच काही निर्माण झाले. आता त्या ब्रम्हची काय अवस्था आहे? जसे, ध्वनी निर्माण झाल्या नंतर शांतता संपते, तसेच (का तद्वत) बरेच काही निर्माण झाल्या नंतर ब्रम्ह पण संपले?आणि संपले नसल्यास, अजून उरले असल्यास, आता तरी त्याच्या "असण्याच्या" काही तरी खुणा दाखवा.

या तुमच्या सगळ्या प्रश्नांना हे उत्तर आहे; 

ते तार्किक आहे, डोळ्यासमोर आहे आणि इतकं प्रत्यक्ष  आहे की  त्याला वेगळ्या पुराव्याची गरजच नाही :
 
ज्यात हे सारे विश्व प्रकट झाले आहे ते काय आहे ? ज्यात या सर्व सूर्यमालिका भ्रमण करतायत ते काय आहे ? ज्यात तुम्ही रात्रंदिवस चालताय, बोलताय, उठताय, निजताय, वावरताय ते काय आहे ? ते देहोत्पत्ती पूर्वी नसेल तर उत्पत्ती असंभव आहे, ते देहाच्या आरपार नसेल तर हालचाल असंभव आहे आणि देहाबरोबर ते नाश पावेल असं समजणं निव्वळ अज्ञान आहे कारण ते अनिर्मित आहे.

 २)  "खरं -ब्रम्ह", आणि ते फक्त मलाच समजलेले आहे, तर तुम्ही मला खोटे / थापाड्या ठरवू शकता?   

तुम्हाला ब्रह्म समजेलेलं नाही आणि समजावून घेण्याची तुमची इच्छाही नाही;  कारण तो केवळ शब्द आणि कल्पना आहे असं तुम्हीच ठामपणे म्हटलंय (का झालं आता विस्मरण ? ) 

मी वर  (१) मध्ये केलेल्या विधानावर (इतर अवांतर सोडून)  फक्त मनन करत राहीलात तरी तुम्हाला उलगडा होऊ शकेल (अर्थात, तुमची इच्छा असेल तर).