चर्चा ब्रह्मावर चालू आहे.
तुमचा नक्की प्रश्न काय आहे ? वाचता येत नाही, वाचतच नाही, का वाचलेलं समजत नाही ? ही सलग विधानं आहेत.
मेंदूत अनंत प्रश्न असल्यानं त्याची क्लॅरिटी हरवली आहे आणि त्यामुळे समोर सतत उभं असलेलं ब्रह्म दिसत नाही; हा खरा मुद्दा आहे ! ब्रह्म दिसायला निर्वेध चित्तदशा हवी, त्यामुळे नजर स्थिर होऊन समोरचं स्पष्ट दिसायला लागतं. आधी म्हटल्याप्रमाणे ब्रह्म ही उघड गोष्ट पण ते दिसण्याच भाग्य फार थोड्यांना लाभतं हे तुम्ही स्वतःच्या प्रतिसादातून शेवटी का होईना दाखवून दिलंत त्या बद्दल धन्यवाद !