प्रतिसादांच्या निमित्तानं ब्रह्माची व्याख्या करण्याचं अपूर्व भाग्य लाभलं. इतकी अचूक आणि दार्शनिक व्याख्या आजवर झालेली नाही. ब्रह्मासारख्या उघड स्थितीबद्दल असलेले भल्याभल्यांचे प्रगाढ गैरसमज, त्यांच्या वैचारिक त्रुटी आणि ब्रह्माचा उलगडा न होण्याची कारणं समजली. ब्रह्माचा उलगडा न झाल्याचाही लोकांना आनंद होऊ शकतो ही विलक्षण गोष्ट जर कृष्णासारख्या व्यक्तींना या पूर्वीच समजली असती तर अखिल मानवता धर्मशून्य जगात किती सुखनैव विहरली असती; असा विचारही मनाला स्पर्शून गेला.