वादे वादे जायते तत्त्वबोधः ।

म्हणजे काय  ? आम्हाला शाळेत आठवी पर्यंत संस्कृत होते. व नववी पासून सायन्स घेण्यास इच्छुक असलेल्या मुला-मुलींच्यात संस्कृत म्हणजे काहीही अर्थ कळला नाही, तरी निव्वळ घोकंपट्टीच्या आधारे पास होण्याचा विषय, असा समज होता. आणि तो समज बरोबर होता हे मी सुद्धा पास झाल्याने सिद्ध झाले. मनोगत वर तुमचे "ब्रम्हाचा शोध" असे तीन लेख आहेत, व तीनही लेख विद्वताप्रचुर आहेत. विशेष करून "उत्तरार्ध" या लेखात तुमचा संस्कृत भाषेचा, संस्कृत साहित्याचा, व संस्कृत वेद-पुराण इत्यादीचा गाढा अभ्यास आहे, असे दिसून येते. (कदाचित, म्हणूनच तुम्हाला "ब्रम्ह" कळले नसावे).  आणि माझे संस्कृतचे ज्ञान म्हणजे नरम नरौ नरः प्रथम:   येवढेच.  (म्हणून मला पण "ब्रम्ह" कळले नसावे). 

तर, वादे वादे जायते तत्त्वबोधः ।म्हणजे काय ?