वादातून ब्रह्म कळू शकतं (तत्त्वाचा अर्थ  कोणतंही ज्ञान असाही आहे).   थोडक्यात वाद आध्यात्मिकच हवा असं नाही पण मूळ उक्तीत तो अर्थ अभिप्रेत आहे.

वादातून तत्त्वबोध व्हायला तीन गोष्टी आवश्यक आहेत. किमान एकाला तरी तत्त्वबोध झालेला हवा, सर्वांनी तत्त्वाबद्दलच वाद (मुद्दे  मांडायला) हवे आणि इतरांना बोध झाल्यास (किंवा ते निरुत्तर झाल्यास) त्यांनी ते मान्य करायला हवं!

सांप्रतात  संकेतस्थळ हे वादातून तत्त्वबोधाचं (किंवा ज्ञानप्राप्तीचं) उत्तम माध्यम आहे.