१.  
>> जोपर्यंत  प्रणयातला आवेग शांत होत नाही तोपर्यंत साधक वर्तमानात येऊ शकत नाही
आणि 
>> साधना म्हणून केलेल्या प्रणयाचा कालावधी दीर्घ असायला हवा.  

हे परस्परविरोधी आहे. वर्तमानात येणं महत्त्वाच त्यामुळे कालावधी दीर्ध किंवा नाही ह्याला महत्त्व नाही. आणि तसंही दीर्घचा कालावधी कोण आणि कसा ठरवू शकणार!

२. किंवा किमान पुरुषाची तरी  प्रणयात चित्तदशा निरभ्रांत हा मुद्दा सयुक्तिक नाही. कारण वर्तमानात येऊन जी समाधीवस्था अनुभवायचीय ती दोघानाही ! कोणालातरी एकाला म्हटला की देण्या-घेण्याचा भाव येतो. जो तुमच्या मुद्दा क्र. ३ शी व्यत्यास जातो.

३. लग्न झाले नसल्यास  समर्पण नसते आणि अपराधी भावना येऊ शकते ह्याला आधार काय? 
------------------------------------------------------------------------------------------

ओशोना वैवाहिक अनुभव शून्य होता ह्याचा आणि ज्या समधीअवस्थेबद्दल (संभोगातून येणारी) ते भाष्य करत आहेत ह्याचा काहीही संबंध नाही. ओशोनी 'संभोगातून समाधीकडे' हे जे काही समजावून सांगितलय त्याच तुमचं नेमकं इंटेर्प्रिटेशन काय हे  सांगा 
(ओशोवर टिप्पणी न करता)

अष्टावक्राचा 'काम हा ज्ञानाचा शत्रू' आहे  ह्यातून जे ज्ञान मिळत ते 'कामेच्छा संपली की जीवनातला उत्साह संपतो' ह्या अज्ञानाला दूर करत. कारण काम हाही एक विकारच आहे जो मनाचे संतुलन घालवतो. कसे? जर कामेच्छा उत्पन्न झाली आणि जोडीदारजर कामोत्सुक नसेल तर काय होत? ती संपवली तर जीवनातला उत्साह संपतो? नाही, तो कामातुराला नेणीवेत नेतो आणि ज्ञानापासून (जाणीव) दूर नेतो.

- (अष्टावक्राचा अभ्यासक) सोकाजी