>> जनक म्हणतो,  मी अज्ञानी किंवा मूर्ख ठरण्याची शक्यताच नाही ! कारण काय ? 

कारण मनाच निस्सरण झालं आहे, निर्मनावस्था प्राप्त झाली आहे. म्हणजेच बाह्यजगतात घडणाऱ्या घटनान्मुळे मनावर तरंग उठणे बंद झाले आहे. मनावर तरंग नाही म्हणजे विचार नाहीत.  हेच - सर्वदा निष्क्रियस्य मे ! 

>> वास्तविकात अध्यात्म ही जीवन समरसून जगण्याची कला आहे.

अध्यात्म = 'अधि + आत्म'- म्हणजे स्वतःकडे पाहणे. अर्थातच स्वतःकडे पाहण्यात आत्मपरीक्षण येते आणि स्वतःशी समरस होता येते.

- (साधक) सोकाजी