>> मनावर तरंग उठणं बंद होणं नाही !
ओके! मनावर तरंग उठताच जी दोलायमान अवस्था होते म्हणजेच चितावर तरंग उठताच ज्या वृत्ती उगम पावतात त्यांच्यावर प्रतिक्षिप्त न होणं अस म्हणायचं होत. म्हणजेच समोर पत्नी आली आणि मन सक्रिय झालं तर ती पत्नी आहे हे कळणार पण, "अरे काय साडी नेसलीय, किती पावडर लावलीय" हे असले दोलायमान विचार न येता समोर फक्त ती आहे हे स्वीकारणं अस म्हणायचं होत :)
>> मी कायम क्रियारहित आहे / मनावर तरंग उठणं बंद होणं
हीच बुद्धावस्था, शून्यता!
>> मनावर तरंग उठणं बंद होणं अशी शारीरिक स्थिती जिवंतपणी येऊ शकत नाही
शून्यता किंवा बुद्धावस्था जिवंतपणीच अनुभवावी लागते कारण आपल्याला मिळालेला "आकार" किंवा आपलं सगुण साकार रूप. त्या सगुणाच्या पलीकडे जाऊन 'निर्गुण निराकार' अनुभवण्यासाठी साधना आणि अध्यात्म!
>> तुम्ही म्हणता तसा तो स्वतःकडे पाहण्याचा प्रयोग नाही, ती जाणिवेचा संपूर्ण रोख स्वतःकडे वळवण्याची प्रक्रिया आहे.
स्वतःकडे पाहणे म्हणजे स्थूलावस्थेच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतून जाणीव (consciousness) अनुभवणे. ती जाणीव स्वानुभवल्यावरच त्या जाणिवेत राहता येणे शक्य होते आणि त्यावेळी आपण म्हणजेच जाणीव ह्याचे आकलन होते. जाणिवेचा रोख स्वतःकडे वळविण्याची गरज नाही कारण आपण म्हणजेच जाणीव (consciousness)