१) तो शब्द तुम्ही अध्यात्म = 'अधि + आत्म' असा समजत होतात. इतके  घोर आणि मूलभूत गैरसमज असतील तर साधकानं सगळं स्वतःसाठी अवघड करून घेतलं आहे !  कारण चुकीच्या दिशेनं कितीही प्रवास केला तरी मुक्कामाला पोहोचण्याची शक्यता नाही.  माझं लेखन सोपं आहे, वाचणाऱ्यानं स्वतःचे गैरसमज बाजूला ठेवून वाचलं तर ते समजेल.

) जनकाची आणि माझी स्थिती काय, सर्व वाचकांची, कळलेल्या किंवा न कळलेल्यांची, सजीव आणि निर्जिवांची  मुळ स्थिती एकच आहे ! आणि तेच तर ठामपणे सांगण्याचा प्रयत्नं आहे.  चुकीच्या धारणा किंवा साधना केल्यामुळे मुद्याकडे लक्ष जात नाही. 

३) आपण म्हणजे जाणीव नाही; आपण जाणीवेच्यापूर्वीची स्थिती आहोत.  ही स्थिती अदिशा आहे; तिचा रोख कुठेही नाही. जगतांना मात्र  बोध होण्यासाठी आपल्याला शरीरातून ठराविक ठिकाणी रोख वळवावा लागतो; हे अदिशा अवस्थेचं शरीरातून ठराविक दिशेनं उन्मुख होणं म्हणजे जाणीव.


पुन्हा लिहितो; शांतपणे वाचलं तर लक्षात यायला काही अवघड नाही 

अदिशा याचा अर्थ दिशाशून्य. आत्मा (किंवा आपली मुळ स्थिती) दिशारहित आहे. अवकाशात कुठेही आणि कितीही दूर गेलं तरी सीमा संपत नाही.  एखाद्या गोष्टीची जाणीव होण्यासाठी आपल्याला त्या दिशेला इंद्रियांमार्फत उन्मुख व्हावं लागतं. समजा आपण शांत बसलो आहोत,  जनक म्हणतो त्या सर्वदा निष्क्रियस्य मे !  या मूळ स्थितीत आहोत.  अष्टावक्राच्या अनावधानस्य सर्वत्र या स्थितीत आहोत आणि अचानक मशिदीतून बांग दिली जाते. ती बांग आहे हे कळायला आपलं अवधान कानामार्फत त्या दिशेनं उन्मुख होतं.   " अनावधानस्य सर्वत्रही स्थिती विचलित होते; " सर्वदा निष्क्रियस्य मे " ही अवस्था सक्रिय होते !


हे मुळ स्थितीचं जाणीवेत रूपांतर आहे, अर्थात रूपांतरण हा भास आहे  कारण सिद्ध मुळ स्थितीपासून विचलित होत नाही ! बस इतकाच फरक आहे सिद्धात आणि साधकात !

 जगातला कुणीही दिग्गज आजपर्यंत अध्यात्म यापेक्षा सोपं करू शकलेला नाही. जाणीवेचा रोख माझ्या व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करण्याऐवजी स्वतःकडे वळवा, तुम्हाला उलगडा होईल.