कुआन म्हणजे कूट प्रश्न किंवा सूत्र नाही; ते एक उत्तर नसलेलं कोडं असतं.  वैचारिक उहापोहातून स्वतःप्रत येणं अशक्य आहे हे कळण्यासाठी झेन साधकाला ते कोडं सोडवायला दिलं जातं. जोपर्यंत साधक सिद्धाकडे कुआनचं उत्तर घेऊन जातो, मग ते उत्तर कितीही प्रगल्भ असो, सिद्ध त्याला पुन्हा उत्तर आणायला सांगतो आणि  हाकलून देतो. एका क्षणी साधकाला कळतं की कुआन सोडवण्यात काहीही अर्थ नाही कारण  आपण स्वतःच उत्तर आहोत !  मग तो  जिथे असेल तिथेच शांत बसून राहतो, त्याला काहीही शोधायची गरज उरत नाही; कारण आपण स्वतःलाच शोधत होतो हे त्याच्या लक्षात येतं ! मग सिद्ध स्वतःच त्याला शोधात येतो ! शांत बसलेल्या शिष्याला तो उठवतो आणि मिठी मारतो !

सटोरीचा अर्थ साक्षात्कार नसून साक्षात्काराची (क्षणिक) झलक असा आहे.  झेन संप्रदायात साक्षात्काराला नांव नाही.