काही प्रश्न

१ - "जहाल" आणि "सडेतोड"  / "परखड" हे एकच, का वेगवेगळे?  वेगवेगळे  असल्यास मनोगत वर प्रकाशित झालेल्या काही प्रतिक्रियातील उदाहरणे देऊन फरक नीट  समजावून सांगावा 

२-  "मवाळ" आणि "गुळमुळीत" हे एकच, का वेगवेगळे?  वेगवेगळे असल्यास मनोगत  वर प्रकाशित झालेल्या काही प्रतिक्रियातील उदाहरणे देऊन फरक नीट समजावून सांगावा 

३- नकारात्मक आणि सकारात्मक म्हणजे तरी नक्की काय?  आमटी खारट झाली आहे  व डाळ नीट शिजली पण नाहीये, असे म्हणणे नकारात्मक का?  व, आमटी छानच  झाली आहे, पण मीठ जरा कमी घातले असते व डाळ थोडी जास्त शिजविली असती, तर  अति उत्तम झाली असती, असे म्हणणे म्हणजे सकारात्मक का? (आणि तसे असेल, तर मग कुत्सित - सरकास्टिक - म्हणजे काय?)