प्रतिसाद न येण्याचं प्रमुख कारण म्हणजे दिलेला प्रतिसाद प्रकाशित होण्यातली दिरंगाई ! प्रकाशित होणाऱ्या लेखांबद्दलही हाच अनुभव आहे. एखाद्या गवयानं उत्तम तान घेतली आणि त्याला मध्यांतरात दाद मिळाली तर दाद देणाराही पुढची दाद द्यायला अनुत्सुक होतो आणि गायकाला ही त्याचं अप्रूप रहात नाही.  सर्वात जास्त लेख प्रकाशित झालेला आणि प्रतिसाद देणारा एक सदस्य म्हणून माझं हे मत आहे. प्रशासनानं सर्व प्रतिसाद आणि लेख लगोलग प्रकाशित होण्याची सुविधा कार्यन्वित केली आणि धोरणात न बसणारं लेखन किंवा प्रतिसाद नंतर निस्सरित केलं तर हा प्रश्न सुटेल. 

या लेखात व्यक्त झालेले विचार चिंतनीय आहेत हे नक्की.