हल्ली मनोगत येथे लिहिण्यास एक नवीन त्रास सुरू झाला आहे.  "मजकूर तांत्रिक दृष्ट्या स्वीकारणे कठिण आहे . . आधी नोटपॅड मध्ये .. . . "  हा मेसेज येत राहतो, काहीही कारण नसताना.  अगदी थेट मनोगतच्या खिडकीतच लिहिले, तरी सुद्धा. हा आजचा प्रतिसाद मी पूर्ण पणे मनोगतच्या एडिटर मध्येच लिहिला. इतर कुठे लिहून चिकटविला नाही. तरी सुद्धा तांत्रिक दृष्ट्या स्वीकारणे कठिण आहे हा मेसेज आलाच.

कालच्या माझ्या प्रतिसादात मी लिहिले होते कि मराठीसृष्टी येथे पब्लिश झालेले दोन लेख इथे कॉपी पेस्ट करीत आहे. पण ते होऊ शकले नाही. वर्ड मध्ये लिहिलेले लेख, आधी नोटपॅड मध्ये चिकटविले, मग तेथून पुन्हा कॉपी करून मनोगत मध्ये चिकटविले, तरी सुद्धा तांत्रिक दृष्ट्या स्वीकारणे कठिण आहे . . हा मेसेज येतच राहिला.

मी असे पाहिले आहे कि हा मेसेज आला, कि आधी मनोगत बंद करून ते पुन्हा उघडायचे, व मगच नोटपॅड मध्ये कॉपी केलेलामजकूरचिकटवायचा. तरच तो ऍक्सेप्ट होतो.

आणखीन एक समस्या म्हणजे मनोगतला असलेली रोमन लिपीची ऍलर्जी. मराठीसृष्टी येथे पब्लिश झालेल्या दोन्ही लेखांची लिंक द्यायचा प्रयत्न केला. पण लिंक रोमन लिपीत असल्याने ते पण मनोगतला मान्य नाही. रोमन अक्षरे १० % टक्के लिमिट मध्ये असून सुद्धा. पण इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहिले तर ते चालते. 

आय कॅन राईट ऍन एंटायर आर्टिकल इन इंग्लिश, बट इन देवनगरी स्क्रिप्ट, ऍंड मनोगत विल हॅव नो प्रोब्लेम्स विथ दॅट. धि इस सिली. ('सिली', हा शब्द जहाल, कि परखड ? ) मागे एकदा मी मनोगत येथेच एका प्रतिसादात "स्टेशनरी, कटलरी, ऍंड जनरल मर्चण्टस ऍसोसियेशन" या संस्थेला मराठीच्या वापरा करता पुरस्कार मिळाला, त्याची खिल्ली उडवली होती. एक शब्द पण मराठी नाही. तरी पण मराठी करता पुरस्कार. भाषा व लिपी यातील फर्क न समजल्याने हे असे होते. किमान वेब लिंक, ई-मेल पत्त, या करता तरी देवनागरी लिपीचे बंधन असू नये.

जाता जाता :  मराठी प्रेमिकांनी आकडे रोमन वापरण्या वर गांभीर्याने विचार करावा. जगात इतर देशात आकडे रोमनच वापरतात. केवळ फ्रेंच वा जर्मन भाषेतच नाही तर चीनी, जपानी वगैरे भाषेत सुद्धा.