प्रतिसादाविषयी आपले निरीक्षण योग्य आहे. प्रतिसाद आणि प्रतिक्रिया शब्द सारखे वाटले तरी अहंकारी व्यक्तीचा प्रतिसाद नसून ती प्रतिक्रिया असते त्यामुळे लेख कसा आहे किंवा
तो कसा भावला यापेक्षा तो वाचल्यावर त्याची चिरफाड कशी करता येईल या आवेशात ते हातात शस्त्र घेऊन बसल्यासारखे त्यावर तुटून पडतात, ।
प्रतिसाद हा साद या शब्दाशी निगडित आहे . त्यामुळे प्रतिसाद देणारा मूळ साद म्हणजे साहित्याचा लिखित भाग त्याला उद्देशून स्वतःचे मत व्यक्त करतो स्वतःच्या काही अनुभवांची किंवा इतरत्र वाचलेल्या मतांची भर घालतो. त्यामुळे मूळ लेखा(साद)प्रमाणेच हे प्रतिसादही वाचनीय असतात, जश्या खांडेकर किंवा इंग्रजीत बर्नार्ड शॉ यांच्या प्रस्तावनाही मूळ पुस्तकाइतक्याच वाचनीय असतात.