त्यामुळे कळायला अडचण येतेयं. दुसरा काय म्हणतोयं हे समजूनच प्रतिसाद दिले जातात पण त्याला समजलंच नसेल तर पुन्हा तेच सांगावं लागतं. त्यातून कहर म्हणजे जो समजावतोयं त्याच्या शब्दांना आपण निरर्थक समजत असू तर कळण्याची शक्यताच संपली !  तत्त्वमसी हा शब्दच आहे; त्यालाही बुडबुडा म्हणता येईल.  अष्टावक्र संहितेला तुम्ही मोठ्ठा बुडबुडा म्हणू शकता; पण मुळ प्रश्न अनाकलनाचा आहे शब्द योजनेचा नाही. 

आता तरी नीट वाचा 

१) स्थूल, सूक्ष्म, अलीकडे, पलीकडे हे सुद्धा शब्दच आहेत आणि ते पूर्णतः निरर्थक आहेत कारण आपलं स्वरूप ही स्थिती आहे; त्यात असे भेद नाहीत

२)  जाणीव अनुभवणे  किंवा स्वतःकडे पाहणे हे  सुद्धा स्वरूपाचा उलगडा होण्याचे मार्ग नाहीत कारण (तुम्हाला समजत नसलं तरी), आपण (किंवा स्वरूप) ही जाणीवेच्यापूर्वीची स्थिती आहोत.

३) आपण एक स्थिर स्थिती असल्यानं कोणतीही साधना त्या स्थितीप्रत नेऊ शकत नाही, कारण कोणतीही साधना ही क्रिया आहे.  आपल्याला फक्त स्वरूपाचा उलगडा होतो. आपण मुळातच स्थिती असल्यानं स्वतःप्रत येण्याचा कोणताही मार्ग नाही. तुम्ही चुकीची साधना करतायं आणि त्यामुळे तुम्हाला उलगडा होत नाही ; आणि  त्यात पुन्हा जिथे समजण्याची शक्यता आहे तिथेच स्वतःचं चुकीचं म्हणणं रेटतायं त्यामुळे उलगडा होत नाहीये. 


४) जाणीवेचा रोख स्वतःकडे वळवणं हा त्यातल्या त्यात एकमेव मार्ग आहे; अर्थात वर म्हटल्याप्रमाणे हा मार्ग फक्त उलगडा होण्याची शक्यता निर्माण करतो. यासाठी नेमकी साधना कशी करायची हे झेन संप्रदायाच्या लेखावर मी प्रतिसादात सविस्तर लिहिलं आहे ते शांतपणे वाचा. 

(संपादित : प्रसासक)