लोकमान्य टिळकानीही अध्यात्म याची फोड अध्य+आत्म अशी केली नाही . पहा गीतारहस्य पृ,५६. कर्मयोगशास्त्र या प्रकरणात आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक विवेचन अशी विभागणी करून  "बाह्य सृष्टीचे सर्व व्यवहार व मनुष्याचे शरीरात आत्मस्वरूपाने राहून त्याला सकल सृष्टीचे ---------- "  या ५६व्या पृष्ठावरील खालून तिसऱ्या ओळीपासून सुरवात करून अध्यात्म व आध्यात्मिक विवेचन या विषयावर त्यानी ते प्रकरण संपवले आहे पण तेवढ्या भागात आपण केलेली  फोड कोठे आढळत नाही. कदाचित मंडालेच्या तुरुंगात लोकमान्याना आपणास माहीत असणारा संदर्भ मिळला नसावा .अर्थात मी चुकीचा संदर्भ देत असेन तर क्षमस्व !