कुशाग्र, ती फोड संजय्जीन्नी यान्नी केलेली नाही. अधि + आत्म अस मी म्हणालो आहे माझ्या प्रतिसादात.
'गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र' हा अफाट ग्रंथ आहे. त्यातल्या 'अध्यात्म' ह्या प्रकरणात, प्रकृती आणि पुरुष हे सांख्यांचे द्वैत न मानता तिसरे पुरुषोत्तमरुपी नित्य तत्त्व जगाच्या बुडाशी आहे, ह्या वेदांतशास्त्रावर उहापोह केलाय. हेच पुढे 'ब्रह्मांडी ते पिंडी' अस मांडून ते तत्त्व इंद्रियातीत आहे अस बरेच संदर्भ देऊन विवेचन केल आहे.
त्यावरूनच मी, जे पिंडी आहे, इंद्रियातीत आहे, त्याची अनुभूती घेण्यासाठी अधि + आत्म म्हणजे, स्वत:च्या आत डोकावणे (मार्ग) अस म्हणतोय.
- (साधक) सोकाजी