कुणी सांगितलंय असं ?  प्रकृती आणि पुरुष हे द्वैत नाही. प्रकृती पुरुषात प्रकट होते आणि त्यातच विलीन होते. उदाहरणार्थ, समुद्र हा पुरुष आहे आणि मासा ही प्रकृती आहे.  मासा हा समुद्राचं अविभिन्न अंग आहे; मासा आणि समुद्र यात द्वैत नाही. नुसता समुद्र फार एकाकी वाटला असता म्हणून वैविध्यपूर्ण जलसृष्टी निर्माण झाली.  तद्वत, नुसता निराकार निर्विकार भासला असता; म्हणून त्यात प्रकृतीचे गहिरे रंग निर्माण झाले . इथे एकसोएक लावण्यमयी आकार आहेत, संगीत आहे, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, चित्रकला, नृत्य, साहित्य, विनोद, अशी अनेकानेक प्रकटीकरणं आहेत; ज्यांचा पुरुष हा स्रोत आहे. अज्ञानी लोकांना ते द्वैत भासलं असेल तर तो त्यांच्या अनाकलनाचा प्रश्न आहे. 

पिंडी ते ब्रह्मांडी हा वेगळा विचार आहे त्याचा प्रकृती आणि पुरुषाशी सुतराम संबंध नाही.  शिवाय पिंडी ते ब्रह्मांडी समजण्यासाठी आत बघून काही उपयोग नाही. मित्राचे वडील शंकरशेट शिष्यवृतीधारक आहेत; सकाळीच त्यांना  "अधि + आत्म"  या विग्रहाबद्दल विचारल्यावर त्यांनी अधिचा अर्थ संबंधी असा सांगितला ! थोडक्यात, तिथे ही डोकावण्याचा किंवा आत पाहण्याच्या प्रश्न नाही.