मतभिन्नतेला किंवा पलायनवादाला जागाच नाही.   बुद्ध सत्याला शून्य म्हणत असला आणि उपनिषदं पूर्ण म्हणत असली तरी दोन्ही बरोबरच आहेत; कारण ज्यात सर्व उत्पत्ती, चलन आणि लय होतं ते तत्त्व एका दृष्टीनं निराकार (शून्य आहे);  पण दुसऱ्या दृष्टीनं ते इतकं परिपूर्ण आहे की आत-बाहेर, यत्र-तत्र, सर्वत्र; ते एकच तत्त्व समग्र व्यापून आहे.  बुद्ध आणि उपनिषदं यात मतभेद नाही, फक्त मांडणीत फरक आहे. 

उपनिषदं सत्याला पूर्ण म्हणतात म्हणून बुद्ध त्याचा शून्यवाद मांडायला कचरत नाही किंवा "आपले मतभेद आहेत यावर एकमत होऊ असा" असा पलायनवादही करत नाही. बुद्ध त्याचा शून्यवाद तितकाच ठामपणे मांडतो कारण उपनिषदाचे ऋषी आणि बुद्ध दोघेही सिद्ध आहेत.  

मी स्वतः सत्य आहे आणि या लेखमालातून  मी सत्याचा उदघोष करतो; जेणे करून वाचकांना ते सुद्धा सत्यच आहेत (स्वतःला समजत असलेली व्यक्ती नाही) हा उलगडा व्हावा.  मतभिन्नता किंवा त्यामागे दडलेला पलायनवाद हा तुमच्या अनाकलनाचा प्रश्न आहे; माझ्याशी त्याचा सुतराम संबंध नाही.