प्रत्येकाची अनुभूती ही कर्मविपाक भिन्न असते ?

मुळात सर्व अनुभव मनात आहेत; अनुभवाच्या मागे लागणं म्हणजेच तर संसार आणि अनुभवणाऱ्याप्रत येणं म्हणजे अध्यात्म  ! अनेकांचे अनंत अनुभव असले तरी ; सर्वांमध्ये अनुभवणारा एक आहे. इथपर्यंत आलं तर अंतिम चरणात अनुभवणारा ही राहत नाही; फक्त अनुभवणं राहतं

अती वाचन आणि त्यामुळे तयार झालेल्या चुकीच्या धारणा यातून कर्मविपाक वगैरे भानगडी ढाल म्हणून वापरल्या गेल्या आहेत. आपलं स्वरूप कायम निर्विकार आहे त्याला कसलंही लेपन होऊ शकत नाही. निसर्गदत्त महाराजांचं एक महान वाक्य आहे; कोणताही अनुभव नसलेला मी एक महानुभवी आहे !

अध्यात्मात चर्चा होत नाही, उदघोष होतो ! आणि अध्यात्मात, उलगडा न झालेला; उलगडा झालेल्याला विनम्रपणे विचारतो.  तुम्हाला उलगडा झालेला नाही हे प्रत्येक प्रतिसाद सिद्ध करतो; तरीही तुम्हाला उलगडा झाला आहे असं वाटत असेल तर उदघोष करा. तुमची स्वतःची स्वतंत्र लेखमाला लिहून तुमचं सत्याचं आकलन जाहीरपणे मांडा.