ह्या हिंदू हाॅटेलांत सर्व जातिधर्माच्या लोकांना प्रवेश असतो. तशी एक पाटीही आतल्या बाजूस असते. हाॅटेलांत चहा-काॅफी-दूध आणि फारतर शीतपेये मिळतात. चहाचे अनेक प्रकार असतात.  फारच क्वचित फराळाचे जिन्नस असतात.

शंकर विलास हिंदू हाॅटेलच्या मुंबईत विरार (पूर्व), सांताक्रुझ (पश्चिम), घाटकोपर (पूर्व) वगैरे वगैरे अनेक शाखा आहेत. चेंबूरच्या शाखेत जेवण (माणशी २५० रुपये) आणि इतर खाद्यपदार्थही मिळतात.

घाटकोपर ईस्टच्या शंकरविलास हिंदू हाॅटेलचा मेनू :
* दिलखुश चहा - २४ रुपये
* गोल्डन चहा - १८ रुपये
* नेसकॅफे - २६ रुपये
* उकाळा - २० रुपये
* केशरी उकाळा - २२ रुपये
* मसाला दूध - ३२ रुपये
* बिनसाखरेचा चहा - २५ रुपये
* शक्कर कम चहा - २६ रुपये
* कटिंग चहा - ९ रुपये