>> सद्यकालात 
धर्म (धम्म म्हणजेच निसर्गनियम) सनातन असतो. त्याचे अनुसरण किंवा त्यानुसारचे मार्गक्रमण हे कालातीत असते. 
तसेच मानवी चित्तदशाही सनातन असते. ही चित्तदशा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या षडरिपूंनी प्रभावित होते, हे सनातन / कालातीत आहेत.  

>> विपश्यनेचा काहीही उपयोग नाही.  
ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे वेगवेगळे साधनामार्ग आहेत. साधकांनी आपापल्या अनुभूतीनुसार योग्य तो मार्ग अनुसरायचा असतो. अमुक एक मार्गच योग्य / उपयोगी किंवा अयोग्य / अनुपयोगी असं अजिबातच नसतं.

>> अत्यंत कंटाळवाणी साधना आहे
ह्यावर मी  पामर काय बोलणार. कंटाळा म्हणजे काय हेच नेमकं विपश्यना केल्यावर कळते. ती एक चित्तदशा आहे,  मनावरचा संस्कार आहे ज्याचं निर्मूलन करता येतं आणि ते नेमकं कसं करायचं ह्याचा मार्ग  विपश्यनेत आहे नुसतं तत्त्वज्ञान नाही. 

>> कालापव्यय आणि या साधनेची फलश्रुतीच होत नसल्यानं येणारं नैराश्य हा एक नवा ताप होऊन बसतो. 
स्वानुभवावरून जनरायलेझन करणे योग्य नाही.

- (सनातन) सोकाजी