सत्याचा उलगडा म्हणजे आपण सत्य आहोत हा उलगडा होणं. हा उलगडा आहे त्यामुळे कोणतीही प्रक्रिया हा त्या उलगड्यात अडथळा आहे. तरीही मनाची क्रिया थांबली की तो उलगडा होतो हा अध्यात्मिक सिद्धांत आहे. बुद्धाच्या काळातल्याा व्यक्तिची आणि सद्यकालीन व्यक्तीची मनोदशा यात हजारो वर्षांचं अंतर आहे. तस्मात, षडरिपु वगैरे धोपट गोष्टींपेक्षाही मनोव्यापारात कमालीचे फेरबदल झााले आहेेत. त्यामुुळे विपश्यना ही एक कालबाह्य साधना झाली आहे.