एक प्रश्न
ज्यांना हे ब्रम्ह वगैरे समजलेले आहे, ज्यांना जडावस्थेच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतली अनुभूती घेत होणारे खरे विज्ञान आकलन झालेले आहे; ज्यांना माया भासमान आणि अशाश्वत आहे, तिच्यामुळेच दुःख उपजते, हे पण समजलेले आहे; ज्यानीं विवेक बुद्धीने पाहिले असल्याने तिचे सत्यस्वरूप त्यांच्या लक्षात आलेले आहे व शाश्वत अशा पूर्णब्रम्हाची महती त्यानां कळली आहे व ते माया पाश सोडवून, परब्रम्हाची उपासना करीत आहेत, वगैरे, वगैरे, वगैरे, वगैरे, . . . त्यांना
स्टेट बँकेने एफडी चे व्याज दर कमी केले; म्युचुअल फंडाचे रिटर्न कमी झाले; किंवा ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बुडाली; ऍमेझोन वर ५०,००० रु खर्च करून महागडा मोबाईल मागवला पण पॅकेट मध्ये फक्त एक दगड निघाला; नवीन शर्टा वर तेलकट डाग पडला; फ्लाईट ४ तास लेट झाली; कुत्रा चावला; . . . . . एकादा प्रियजन काळाच्या पडद्या आड गेला, . . . . , कि त्यांना राग / दुख इत्यादी होतात, का ते " ह्यॅ ही सगळी तर माया आहे; भाससमान आहे" वगैरे म्हणून आनंदातच राहतात ?