>> त्यांना राग / दुख इत्यादी होतात, का नाही होणार? 

पण त्या रागात आणि दु:खात ही सगळी तर माया आहे; भाससमान आहे" वगैरे म्हणून आनंदात न राहता 
  1. व्याकूळ होऊन मन:शांती  घालवायची की 
  2. सत्य परिथितीला सामोरे जाऊन शांतपणे परिस्थीती हाताळायची 
ह्यातल्या कोणत्या पर्यायाची निवड करायची जाणीव असल्याने आनंदी मनस्थितीचा अनुभव घेऊ शकतात.    

स्टेट बँकेने एफडी चे व्याज दर कमी केले; म्युचुअल फंडाचे रिटर्न कमी झाले; किंवा ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बुडाली; ऍमेझोन वर ५०,००० रु खर्च करून महागडा मोबाईल मागवला पण पॅकेट मध्ये फक्त एक दगड निघाला; नवीन शर्टा वर तेलकट डाग पडला; फ्लाईट ४ तास लेट झाली; कुत्रा चावला; . . . . . एकादा प्रियजन काळाच्या पडद्या आड गेला,

ह्यातली कुठलीही घटना आपलया नियंत्रणात  नसते. त्यामुळे  राग / दु:ख (संवेदना) झाले तरी सत्य परिस्थिती तशीच राहते बदलत नाही. तेव्हा त्या परिस्थितीच्या त्याब्यात न जाता (संवेदानावर प्रतिक्षिप्त न होता) विवेक बुद्धीने परिथिती हाताळणे हेच उपयोगाचे असते.

- (साधक) सोकाजी