काल भास आहे हे सिद्धाचं आकलन आहे. साधकासाठी काल  हा रोजचा ताप आहे ! तव्दत, कुणामध्ये कुणीही नाही हा सिद्धाला झालेला उलगडा आहे, साधक अजूनही स्वतःला व्यक्तिच समजतो आहे आणि तिथेच तर सगळा घोळ आहे.

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिद्ध साधनामुक्त आहे. साधक संभ्रमात असल्यामुळे त्याला साधना करावी लागते आहे. तर मुद्दा असा की साधना सोपी आणि तत्क्षणी वर्तमानात आणणारी हवी. दशवार्षिक प्रयासानंतर सुद्धा साधना चालूच राहाणार असेल तर ती सुरुवातीलाच बाद करणं योग्य !