पण एफडी चे व्याज दर / म्युचुअल फंडाचे रिटर्न कमी होणे; ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बुडणे; ऍमेझोन कडून मागवलेल्या मोबाईलच्या पॅकेट मध्ये फक्त एक दगड निघणे; नवीन शर्टा वर तेलकट डाग पडणे; फ्लाईट ४ तास लेट होणे; कुत्रा चावणे; . . . . . एकादा प्रियजन काळाच्या पडद्या आड जाणे; . . .  हे सर्व माया, भासमान आणि अशाश्वत आहे आणि ते तसे आहे हे समजलेले आहे, तर मग "सत्य परिथितीला सामोरे जाऊन हाताळणे"  म्हणजे जे काही असेल ते करण्याची गरजच काय?  मोबाईलच्या पॅकेट मध्ये मोबाईलच निघाला तर ती मायाच; दगड निघाला तर ती पण मायाच. परिथितीला सामोरे जाऊन हाताळण्याची - जसे, ऍमेझोनला तक्रार करण्याची - गरजच काय ? माया तुमच्या समोर दगड स्वरूपात प्रकटली, का मोबाईल स्वरूपात प्रकटली, शेवटी मायाच ती. काय फरक पडतो ?

आमच्या निकटच्या नात्यात दोन व्यक्ती होत्या, ज्या वीस पेक्षा अधिक वर्षे रोज सत्संगात जात असत. मला अनेकदा हा प्रश्न पडत असे, की सत्संगात जे काही मिळते, ते म्हणजे बीपीची गोळी आहे का, की त्याचा इफेक्ट फक्त 24 तासच राहतो व 24 तासा नंतर परत renew करावा लागतो ? 

मी असे पाहिले आहे की सत्संग, अध्यात्माचा व्यासंग वगैरे करणाऱ्यांचे "मी" पण कमी व्हायच्या ऐवजी वाढतच असते. त्यांना एक अहंगंड असतो. "आम्ही सत्संगात जातो, तिथे आम्ही अमूक तमूक शिकतो", वगैरे. (किंवा, मला ब्रम्ह समजलेले आहे, वगैरे) व माझ्या सारखे लोक त्यांच्या द्रुष्टीने काहीतरी क्षूद्र असतात. पण वास्तव असे आहे की ते व मी, काहीही फरक नसतो. राग, लोभ, द्वेष, आनंद, दुख, . . . . सर्व भावना त्यांच्यात पण तश्याच असतात, मात्र ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा नसतो. तत्वज्ञान या विषयाचे एक नावाजलेले मराठी प्रोफेसर (इंदूरच्या कॉलेज मध्ये) त्यांच्या बद्दल असे वाचनात आले, की ते नवीन वर्षाचा तत्वज्ञान या विषयाचा पहिला तास सुरुवात करताना सांगत "तत्वज्ञानाने दाढ-दुखी थांबत नाही". Superb, Fantastic.  प्रामाणिकपणा करता या प्रोफेसर महाशयना 100% टक्के मार्क.  तत्वज्ञानाने दाढ-दुखी थांबत नाही. तसेच परब्रम्ह समजल्याने; जडावस्थेच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतली अनुभूती घेतल्याने; खऱ्या विज्ञानाचे आकलन झाल्याने, दाढ-दुखी थांबत नाही.