प्रातिनिधिक प्रदर्शन !
१. अध्यात्मात माया म्हणजे दगड आणि लॅपटॉप एकच असा निर्बुद्धपणा नाही. त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण ज्यातून त्या उत्पन्न झाल्यात तो निराकार एक आहे. तस्मात, दगड मिळाल्यावर सत्य गवसलेला निश्चित तक्रार करेल.
२. तव्दत, अध्यात्मानं दाढ दुखी थांबेल अशी अपेक्षा केवळ मूढपणा आहे. सिद्ध त्यासाठी उपचार करेल, फरक फक्त इतकाच की सिद्धाला माझी दाढ दुखते असं (भाषेत जरी म्हटलं ) तरी वेदना शरीराला आहे, आपल्याला नाही याचं कायम भान असेल