>> मोबाईलच्या पॅकेट मध्ये मोबाईलच निघाला तर ती मायाच; दगड निघाला तर ती पण मायाच; परिथितीला सामोरे जाऊन हाताळण्याची - जसे, ऍमेझोनला तक्रार करण्याची - गरजच काय ?

जेव्हा मोबाइल ऍमेझॉनवर ऑर्डर केला तेव्हा त्यामागे मोबाइलची वापरासाठीची  गरज असेल तर दगड निघाला तर ती गरज पूर्ण होणार नाही. म्हणून त्या मूळ गरजेपूर्तीसाठी ऍमेझोनला तक्रार करून मोबाइल मिळवणे क्रमप्राप्त आहे. 

फसवणूक झाली म्हणून किंवा बघतोच आता ऍमेझॉनकडे, धडा शिकवतोच, ह्या विचारांच्या गर्तेत अडकणे हाही पर्याय असतो पण ते त्या परिस्थितीचे त्या व्यक्तिवरचे नियंत्रण असते. ह्या विचारांच्या गर्तेत न अडकण्यासाठी  आणि परिस्थिती आपाल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सामोरे जाणे गरजेचे असते. 

>>  माया तुमच्या समोर दगड स्वरूपात प्रकटली, का मोबाईल स्वरूपात प्रकटली, शेवटी मायाच ती.
हे जेव्हा स्वानुभूतीने समजेल तेव्हा 'काय फरक पडतो ?' प्रश्नच उपस्थित होणार नाही, पण जो पर्यंत हे फक्त बौद्धिक पातळीवरचं चिंतन असेल तोपर्यंत हा प्रश्न विकल्प म्हणून उपस्थित होत राहणारच कारण ती थियरी झाली, प्रात्यक्षिकाशिवाय / प्रयोगाशिवाय, अनुभूती येणार नाही. चौथीपर्यंत शाळेत शास्त्र हा विषय 'प्रयोगातून विज्ञान' असा होता माझ्यावेळी. प्रयोग करून समजल्याशिवाय रट्टा मारला तर विषय  बौद्धिक पातळीवर पाठ होईल पण आकलन होणार नाही. त्यामुळे ह्या मायेवर दोन्ही बाजूने बरीच चर्चा करता येईल पण त्याची फलनिष्पती होणार नाही.   

>> तत्वज्ञानाने दाढ-दुखी थांबत नाही
बॅंग ऑन किंवा बुल्स आय!! 

तत्वज्ञान किंवा philosophy ची व्याख्या अशी आहे - the study of the fundamental nature of knowledge, reality, and existence, especially when considered as an academic discipline. 

मुद्दा क्र. १ :
त्यामुळे दाढदुखी थांबणार नाहीच कारण त्यात दाढदुखीची उपाय नाही  किंवा दाढदुखी कशी थांबवावी ह्याचा मार्ग नाही.  ऍकॅडमीक विषय असल्याने त्याची सांगड १५ किंवा २० मार्कांचे प्रश्न ह्याच्याशीच घातली जाते दुर्दैवाने आणि त्या तत्त्वज्ञानार दाढदुखीचा उपाय नसला तरीही त्यामागचे कारण किंवा त्यामागचे कारण शोधण्याची मिमांसा तत्वज्ञानात आहे ह्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यापेक्षाही अघिकचे दुर्दैव म्हणजे तो विषय शिकवणारा प्रोफेसरच जर तत्वज्ञानाने दाढ-दुखी थांबत नाही असा निकाल लावणार असेल तर तत्वज्ञान शिकावे तरी का?

मुद्दा क्र. २:
तत्वज्ञान ही फक्त थियरी आहे त्याला प्रत्यक्षिकाची जोड नसली की फक्त बौद्धिक पातळीवरच चिंतन राहतं अनुभूतीच्या पातळीवर उतरत नाही.  तत्वज्ञान, दाढ दुखते म्हणजे काय होते हे फक्त सांगू शकते किंवा त्यामागचे कारण सांगू शकते. पण त्याचे निर्मूलन हे प्रात्यक्षिक आहे. ते केल्याशिवाय दाढदूखी दूर होणार नाही. 

>> तसेच परब्रम्ह समजल्याने; जडावस्थेच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतली अनुभूती घेतल्याने; खऱ्या विज्ञानाचे आकलन झाल्याने, दाढ-दुखी थांबत नाही.
हे अनुमान तुम्ही प्रात्यक्षिक करून म्हणजे स्वानुभूतीवरून काढलंय की ऐकीव आणि बैद्धिक माहितीच्या आधारे? 
ऐकीव असेल तर प्रश्न मिटला. पण जर स्वानुभवावरून  केलेलं असेल तर त्यावर अजून माहिती करून घ्यायला आवडेल, त्यावरून दाढदूखी का थांबली नाही हे कळेल, त्या प्रात्यक्षिकाची चिकीत्सा करून.   

- (चर्चोत्सुक) सोकाजी