>> तत्वज्ञानात दाढदुखीचा उपाय नाही  किंवा दाढदुखी कशी थांबवावी ह्याचा मार्ग नाही, हा मुद्दा नव्हता. 

तसं मलाही म्हणायचं नव्हत. 'तत्त्वज्ञानार दाढदुखीचा उपाय नसला तरीही त्यामागचे कारण किंवा त्यामागचे कारण शोधण्याची मिमांसा तत्वज्ञानात आहे ह्याकडे लक्ष दिले जात नाही' असं त्यासाठीच म्हटल होतं. थोडक्यात उपाय असो नसो, तत्त्वज्ञान विचार करण्यास प्रवृत्त करते हा मुद्दा अधोरेखित करायचा होता.

प्रॉब्लेम एक बद्दल: 
मनोगतावर या विषयावरील लेखांमध्ये मानव जमात ही दोन गटात विभागलेली आहे असं अधोरेखित होते हे तुमच वाटणं किंवा हा आक्षेप दखलपात्र असूही शकेल. 

पण ह्या लेखात लेखाचा विषय जो विपश्यना आहे त्यात काहीही धार्मिक नाही, संप्रदायी नाही, दैवी नाही किंवा स्पिरीच्युअल नाही अस स्पष्ट करून ते मन आणि शरिर परस्परसंबंधातील शास्त्र आहे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यात कुठेही दिव्य ज्ञान प्राप्ती झाली आहे हा ऍटीट्यूड नाही. विवीध विचार आणि त्यामुळे शरीरावर उठणार्या संवेदना ह्यांचा परस्परसंबंध समजून घेतला तर मनोव्यापारांवर नियंत्रण मिळवता येते हेच ज्ञान ज्याची आपल्याला म्हणजे समस्तांना, इथे दोन गट अजिबात गृहीत नाहीत, जाणीव नसते आणि अध्यात्म म्हणजे स्वतःचं तटस्थ निरीक्षण, ह्यात आत्मा वगैरे काही नाही हेच अधोरेखित करायचा प्रयत्न आहे. 

अख्खी मानव जमात  खऱ्याअर्थाने  'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दोन गटांत विभागली गेली आहे. नैसर्गिक स्त्रोतांचं विकेंद्रीकरण ह्या दोन गटांत अत्यंत विषम आहे. ह्यामगचे कारण विकारक्षमता, महत्वाकांक्षी नफ़ेखोरी आणि इंद्रियसुखांची लालसा हे आहे असं मांडण्याचा प्रयत्न होता. पण जर त्यामुळे लेखात दिव्य ज्ञान मिळालेल्यांचा एक गट आणि बाकीच्यांचा एक गट असं जर जाणवलं असेल (तसा प्रयत्न नव्हताच किंवा तो आशयही नव्हता) तर ती माझी लेखनमर्यादा, ह्या विषयावर प्रथमच लिहीतो आहे. 

प्रॉब्लेम दोन बद्दल: 
- मी तक्रार करतो, ऍमेझॉनला लीगल नोटिस पाठवितो, ग्राहक मंचा कडे पण फिर्याद दाखल करतो, सोशल मिडीया वर रान उठवितो, ऍमेझॉनला एक सुद्धा पळवाट ठेवीत नाही, हे सगळं करूनही जर दाद मिळालीच नाही तर काय करता / कराल? 

प्रॉब्लेम तीन बद्दल: 
तुम्हाला आनंद होतो म्हणजे नेमकं काय होतं ? बाह्यलक्षणांवरून ते दुसऱ्यांना कळतं पण आतमध्ये नेमकं काय होतं आणि का होतं त्या भावना तुम्ही गणिती समीकरणात मांडून स्पष्ट करू शकता? स्पष्ट करा हाच विकल्प ठेवला फक्त तर तुम्ही कसे स्पष्ट कराल, शब्दांमधूनच ना?  पण जर एखाद्याची आनंदाची अनुभूती जे तुम्ही शब्दांनी स्पष्ट करताय तशी नसेल तर किंवा तो निराशावादी असल्याने कधीही आनंदी अवस्था त्याने अनुभवली नसेल तर त्याने ते, फक्त तुम्हाला तसं 'वाटंतय' अस म्हणणं स्वाभाविक आहे. त्यात दोघांचीही काही चूक नाही.  (इथे आनंदाएवजी प्रेम ही भावना ही जास्त समर्पक होइल पण आता टंकाळा आलाय त्यामुळे एडीट करत नाही, तुम्हीच समजून घ्या)

- (ब्रह्म परब्रह्म ह्याऐवजी 'स्व' जाणण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी