वरचा प्रतिसाद मी काल रात्री लिहिला. अजून त्यावर कोणाची प्रतिक्रिया आलेली नाही. म्हणून कोणी प्रतिक्रिया लिहिण्याच्या आधी एक उदाहरण देऊन आणखीन स्पष्ट करतो.
आधी, बॅकग्राउन्ड. मला भारतीय शास्त्रीय संगीत आवडत. केवळ "आवडत" येवढच नव्हे तर मी त्याचा सखोल अभ्यास केलेला आहे; मी "म्युझिकोलोजिस्ट" आहे. म्हणजे, मी स्वता: गायन/ वादन करू शकत नाही, पण मला संगीताची थियरी उत्तम समजते. लहान-सहान ताण-तणाव दूर करायला मी संगीत वापरतो. जसे, किंचित डोके दुखत असेल, तर कोणतीही गोळी घ्यायच्या ऐवजी मी रवी शंकर यांचा शुद्ध कल्याण किंवा किशोरी अमोणकर यांचा भूप हेडफोन लावून डोळे मिटून ऐकतो, व माझे डोकेदुखी बंद होते. त्याच प्रमाणे मला असेही वाटते की भारतीय शास्त्रीय संगीत हेच खरे संगीत आहे, व इतर सर्व संगीताच्या नावं खाली निव्वळ गोंगाट आहे. ही झाली बॅकग्राउन्ड. आता समजा हेच सर्व मला तुम्हाला सांगायचे आहे, जेणे करून तुम्हाला पण "संगीत therapy" चा फायदा मिळावा. हे दोन प्रकारे लिहिता येईल.
पद्धत एक - भारतीय शास्त्रीय संगीत इतर कोणत्याही संगीत प्रकारापेक्षा वेगळे आहे. इतर प्रकारचे संगीत मनाला उद्दीपीत करते तर भारतीय शास्त्रीय संगीत मनाला शांत करते. अगदी वीर रसाचे राग, जसे अडाणा, सूहा, सुघराई, हे सुद्धा ऐकून तुम्हाला उठून नाचावेसे वाटणार नाही. आणि शांत रसाचे वा भक्ती रसाचे राग, जसे आसावरी, तोडी, यमन, शुद्ध कल्याण, भूप इत्यादि तर तुमच्या उद्दीपीत भावनांना शांत करतात. लहान-सहान ताण-तणाव दूर करायला मी संगीत वापरतो. जसे, किंचित डोके दुखत असेल, तर कोणतीही गोळी घ्यायच्या ऐवजी मी रवी शंकर यांचा शुद्ध कल्याण किंवा किशोरी अमोणकर यांचा भूप हेडफोन लावून डोळे मिटून ऐकतो, व माझे डोकेदुखी बंद होते. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण याचा नक्कीच फायदा होईल. ज्याला भारतीय शास्त्रीय संगीताचा अजून परिचय नाही त्याला ते सुरूवातीला पाहिल्याच "भेटीत" कदाचित आवडणार नाही. पण ऐकणे सुरू ठेवा. लवकरच तुम्हाला ते आवडू लागेल व एका नव्या दुनियेचा दरवाजा उघडल्या सारखे वाटेल.
टीप : इतर सर्व संगीताच्या नावं खाली निव्वळ गोंगाट आहे हे माझे "मौलिक" विचार मी कटाक्षाने लिहायचे टाळले आहे.
पद्धत दोन - भारतीय शास्त्रीय संगीत इतर कोणत्याही संगीत प्रकारापेक्षा वेगळे आहे. येवढेच नव्हे तर भारतीय शास्त्रीय संगीत हेच खरे संगीत आहे, व इतर सर्व संगीताच्या नावं खाली निव्वळ गोंगाट आहे. तुम्ही जे पाशचात्य पॉप संगीत ऐकता, मी संगीताचा ज्ञानी असल्याने मी त्याला संगीत म्हणतच नाही, त्याची एक बेफाम धुंदी मनावर चढते व त्याने धुंद होऊन तुम्ही सगळे एका कैफात जगत आहात. पण लक्षात घ्या, तुमच्या कडे त्या पाशचात्य पॉप संगीताचे भरपूर रेकॉर्डिंग आहे; महागडे हेडफोन आहेत, ते अहोरात्र कानाला लावून तुम्ही ते संगीत - संगीत कसले निव्वळ कर्ण कटू आवाज - ऐकत असता. पण येवढे करूनही तुमचे मानसिक ताण-तणाव कमी झाले का? तुम्ही समाधानी झालात का? तुमचे मन शांत झाले का? तर नाही, उलटपक्षी तुमच्या भावना अधिकच उद्दीपीत होऊन तुम्ही अधिकाधिक विकारक्षम झालात आणि नेणिवेत जगू लागले आहत. संगीता बद्दल अज्ञानामुळे कर्कष्य आवाजालाच संगीत मानून सुखलोलुप होण्यात धन्यता मानत आहात.
भारतीय शास्त्रीय संगीत हेच काय ते संगीत आहे; बाकी सर्व गोंगाट आहे. अजून तुम्हाला हे समजत नाही ? काय आहे, की भारतीय शास्त्रीय संगीत हेच खरे संगीत आहे ही उघड गोष्ट आहे, पण ती कळणारा भाग्यवंत कोट्यवधीमध्ये एखादाच ! जसे रवी शंकर, किशोरी अमोणकर, बिस्मिल्लाह खान, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, . . . . किंवा मी. खरे संगीत काय ते कळायला दोन गोष्टी हव्यात, संपन्नता आणि कमालीची आकलनक्षमता. संपन्नता अनेकांकडे असू शकते पण आकलन क्षमता अत्यंत दुर्लभ. ती माझे कडे आहे. आणि तुमच्या कडे नाही. ज्यांना खर संगीत काय हे समजल नाही ते कायम अस्वस्थतेत जगतील कारण . . . त्यांना शांतता लाभणं असंभव आहे.
दोन पद्धती मध्ये काही फरक दिसला ? (नाही ना ? कसा दिसणार, कोणतीही गोष्ट इतरांना कशी समजावून द्यावी, हे कळण्या करता दोन गोष्टी हव्यात, संपन्नता आणि कमालीची आकलनक्षमता. संपन्नता अनेकांकडे असू शकते पण आकलन क्षमता अत्यंत दुर्लभ. ती माझे कडे आहे. आणि तुमच्या कडे नाही. . . :-)