कालचा तुमचा प्रतिसाद माझ्याकडच्या भल्या रात्री आला होता, सकाळी वाचला. पण आज जरा गडबडीत होतो हापिसात त्यामुळे आत्ता निवांत झाल्यावर प्रतिसाद देतो आहे. 

तुमचा, चर्चा बेसूर होण्याचा आक्षेप वाचल्यावर इथले जुने लेख आणि प्रतिसाद चाळून बघितले आणि तुमचा आक्षेप लक्षात आला.  तुमच्या म्हणण्यात तथ्य असे म्हणता येईल. 

त्यामुळे हे स्पष्टीकरण फक्त माझ्या लेखापुरतेः 
(कारण - जगाला अ-भौतिक पातळी वरचे पांडित्य शिकविणारे तुम्ही सगळे, असा आहे आणि मी ह्या तुम्हीमध्ये गोवला जातोय)

हा माझा ह्या विषयावरचा पहिलाच लेख आहे.  जे मला जाणवले आणि मी जे आणि जसे अनुभवले हे लेखत मांडायचा प्रयत्न होता. हा लेख दिवाळी अंकात प्रकाशित करायचा होता म्हणून करण्याआधी काही जणांना रिव्ह्यूसाठी लेख दिला होता. तेव्हा २०% जणांनि तुम्ही म्हणालात तसे मत देऊन लेख टोन डाउन करायला सांगितला होता. पण ८०% जणांकडून तस मत आलं नाही. त्यामुळे ८०-२० रूल वापरून लेख तसच ठेवला.

पण लेखात मला ब्रह्म किंवा तत्सम काही कळलं आहे असं अजिबात मांडायचं नव्हतं किंवा लेक्चर द्यायचं नव्हतं. जे अनुभवलं आणि जसं अनुभवलं ते फक्त शेयर करायचं होतं. तत्त्वज्ञान न मांडता, एक एफेक्टीव्ह क्रिया किंवा मेथड आहे हे शेयर करायचं होतं. 

मात्र, प्रत्येक लेखकाची एक शैली असते आणि त्याचं सर्जन कसं असायला हवं हे ठरविण्याचा अधिकार फक्त त्याचाच असायला हवा. त्याचे ते सर्जन कसे असायला हवे हे  वाचकाने ठरवणं  योग्य नाही. वाचकाने त्याचे मत (अनुकूल किंवा प्रतिकूल) प्रतिसादातून फक्त द्यावे, जे तुम्ही दिलेत. ते वाचून आणि त्यावर चिंतन केल्यावर तुमचा मुद्दा ध्यानात येऊन पुढच्या लेखांमध्ये काय टाळायचे हे लक्षात आले. त्याबद्दल अनेक धन्यवाद! 

- (अभ्यासू) सोकाजी