अगदी बरोबर. त्याही पेक्षा, तुमचे लेख वाचलेच नसते तर आणखीन त्रास वाचला असता. जसे ते 'चिंता करी जो विश्वाची" सीरीज. वाचलीच नाही. सगळाच त्रास वाचला. पण, अकबर राजाने बीरबलला विचारले कि तुझा गुरू कोण, आणि मग जे काय घडले, ती गोष्ट वाचलेली असून सुद्धा ते त्या वेळी माझ्या ध्यानात आले नाही. ते नंतर लक्षात आले, तुमची अष्टावक्र सीरीज आली तेव्हां.
अकबर राजाची ती गोष्ट ज्यांच्या वाचनात आली नसेल त्यांच्या करता संक्षिप्तात देत आहे. अकबर राजाने एकदा बीरबलला विचारले कि तू इतका हुशार, चतुर, तर तुझा गुरू किती हुशार असेल. तर मला एकदा त्याला भेटायचे आहे. बीरबलने खूप सांगून पाहिले, कि अहो माझा कोणी गुरू असा नाही. पण अकबर ऐकेना. शेवटी बीरबलने गावातील एक टपोरी माणूस पकडून आणला, व त्याला सांगितले कि वेशी बाहेरच्या मंदिरात बसायचे. अकबर राजा तुझ्या कडे येईल, तुला काही प्रश्न विचारेल, पैसे देऊ करेल, प्रलोभने दाखवील. पण तू एक चकार शब्द बोलायचा नाहीस. जर तोंड उघडलेस, तर उद्याच्या दिवशी मी जातीने तुला सुळा वर चढवेन.
मग बीरबलने अकबरला येऊन सांगितले, कि माझे गुरू वेशी बाहेरच्या मंदिरात मुक्काम करून आहेत. अकबर लव्याजम्या सह तिथे गेला, त्याने तिथे बसलेल्या माणसाला अनेक प्रश्न विचारले, पैसे देऊ केले, प्रलोभने दाखवीली, पण तो माणुस काही केल्या बोलेना. शेवटी अकबर कंटाळून परत निघून आला. दुसरे दिवशी अकबरने बीरबलला विचारले "बीरबल, एकाद्या मूर्खाशी गाठ पडली तर काय करावे? ". बीरबलने ताबडतोब उत्तर दिले "गप्प राहावे. एक शब्द पण बोलू नये".
ता. क. या कथेतील सर्व पात्रे किंवा कथा, सर्व काही काल्पनिक आहे, भास-समान आहे, माया आहे.