सोकाजीराव - बीरबल-अकबरची गोष्ट हा प्रतिसाद तुम्हाला नाही, संजय क्षीरसागर यांना होता. "सगळाच त्रास" वाचविण्याची एक आयडिया त्यांनी दिली होती, मी त्याही पेक्षा नामी आयडिया काढली. लेख वाचायचेच नाहीत.

बीरबल-अकबरची गोष्ट, असा वात्रट + बोचरा प्रतिसाद तुम्हाला लिहीणार नाही, कारण तुम्ही "मी सर्व ज्ञानी" असा स्वर कधीच लावला नाहीत. जे काय थोडे मला आक्षेपार्ह्य दिसले, ते तुम्ही ताबडतोब मान्य केलेत, जसे - ". . . तुमचा आक्षेप लक्षात आला.  तुमच्या म्हणण्यात तथ्य असे म्हणता येईल.that was very graceful of you. 

संजय यांची case एकदम वेगळी आहे. ब्रह्मज्ञानावर माझा कुणीही प्रतिवाद करू शकलं नाही. गेली अकरा वर्ष मी इथे इतक्या असंख्य प्रकारे अध्यात्मिक लेखन केलं आहे, मला एकदा ही माघार घ्यावी लागली नाही.

संजय यात आश्चर्य वाटण्या सारख काहीही नाही. आणि भविष्यात पण कधी तसे घडणार नाही.  कारणे अनेक : 

पहिले - मनोगत सारख्या ठिकाणी चर्चेत/ वादविवादात कोणी बाह्य परीक्षक /अंपायर नसतो.  आपणच आपले परीक्षक असतो. त्या मुळे माघार कधीच "घ्यावी लागत" नसते. ती "घ्यायची" असते, स्वेछेने, आपल जरा चुकलच अस स्वतःला वाटल तर. जसे काल सोकाजीराव यांनी केले. आणि तसे मान्य करण्याला "माघार घेण" अस म्हणत नाहीत. त्याला वादविवाद प्रक्रियेतील प्रामाणिकपणा, ग्रेस, इत्यादी म्हणतात.

पण तुम्ही तसे कधीच करणार नाही. कारण तुम्ही अध्यात्मात शिरलेले आहात, आणि बहुतेक अध्यात्मिकांधांना एक अहंगंड असतो. मी, येवढा मोठा ज्ञानी, भाग्यवंत कोट्यवधीमध्ये एखादाच ! एखादा बुद्ध, कृष्ण,  अष्टावक्र, जनक, ओशो, निसर्गदत्त, एकहार्ट, ........ किंवा मी !    स्वतःला बुद्ध, कृष्ण . . .  यांच्या पंक्तीत स्वतःच नेऊन बसविणारे "आपल जरा चुकलच" हे कधीच मान्य करणार नाहीत.

दोन - तुम्ही विचित्र आणि काहीच्या-बाही विधाने करता. जसे, "अध्यात्मिक व्यक्तिला मृत्यूची अनिवार्यता कळली आहे आणि बाकीच्यांना त्याचं भान नाही." म्हणजे ? आम्हा पामरांना असे वाटते की आम्ही अमर आहोत? कसा करायचा याचा प्रतिवाद? माझ्या लेखी, रजिस्टर केलेल्या मृत्यूपत्राची प्रत येथे अपलोड करून ? आणि मृत्यूपत्र करणे हे तरी तुम्ही मृत्यूची अनिवार्यता कळणे, याचे प्रूफ म्हणून मान्य कराल ? 
 
जाता जाता : तुम्हाला मृत्यूची अनिवार्यता कळली आहे, व त्याचे भान आहे ना? मग तुम्ही मृत्यूपत्र केले आहे का ? अध्यात्माची शप्पथ घेऊन खरे सांगा.

तीन - एकूणच तुमची भूमिका axiom आधारित आहे. Axiom = स्वयंसिद्ध, कोणताही पुरावा नसलेले. म्हणून Axiom चा प्रतिवाद करता येत नाही. जसे "कोणत्याही दोन बिंदू मध्ये एक सरळ रेषा काढता येते" हा युकलीडचा पहिला axiom आहे. त्याचप्रमाणे आणखीन पण आहेत. ब्रम्ह आहे, ते सर्वत्र आहे, तुम्हाला अमृत सापडले आहे, . . . . हे सर्व axiom आहेत. प्रतीवाद करण्याचा प्रश्नच येत नाही. 

माझ्या लेखांचा असंख्य लोकांना इतका उपयोग झाला आहे की मला  सुद्धा आश्चर्य आहे. 

यात आश्चर्य वाटण्या सारखे काहीही नाही. केडगावकर महाराज पासून ते सदध्या "निर्मल बाबा" पर्यंत सगळ्यांचाच लोकांना "उपयोग" होत असतो. ("निर्मल बाबा"चे TV चेनल एकदा बघा. "बाबा, माझी पत्नी कायम आजारी असते" या वर बाबा त्या माणसाला "आइसक्रीम खा" असा सल्ला देतात.  आणि प्रचंड गर्दी असते.). एक अनाहूत सल्ला - इथे मनोगत वर वेळ वाया घालविण्या पेक्षा एक आश्रम किंवा टीव्ही चॅनल सुरू करा. सहस्त्र-कोट्याधीश व्हाल. 

आणि शेवटचे - एक वात्रटिका. काही मुले खेळत होती. एकाने म्हंटले की दोन अधिक दोन पाच असतात. दुसाऱ्याने त्याला आव्हान दिले "काही तरीच काय म्हणतोस. दोन अधिक दोन चार असतात." पण तो पहिला काही केल्या ऐकेना. क्षेवटी त्या दोघांनी दहा रुपयांची पैज लावली. त्या वर इतर मुले पहिल्याला म्हणाली "मूर्ख आहेस तू. दोन अधिक दोन चार असतात हे दूसरा सहज सिद्ध करेल व तू दहा रुपये हरशील" या वर पहिला म्हणाला - "अजिबात हरणार नाही. तो कितीही व काहीही प्रूफ देवो, मी ते मान्यच करणार नाही".