१. मृत्यूची अनिवार्यता म्हणजे मृत्यू या क्षणी येऊ शकतो हे भान. ज्यातला हे भान आलं तो वितंडवाद करण्यापेक्षा ' नैनं  छिंदंती शस्राणी' मधे लपलेलं गुह्य शोधायला लागेल ; मृत्यूपत्र करायचा निर्बुद्धपणा करणार नाही.

२. आपण सत्य आहोत ही एकच गोष्ट सर्व सिद्ध सांगतात आणि ती वस्तुस्थिती आहे हे जाहीर करणं याला चूक समजणं ही अज्ञानाची हद्द आहे !

सोत्रिंनी माघार घेतली कारण जे लिहीलंय तो त्यांचा अनुभव नाही. सगळं कॉपी/पेस्ट काम आहे. मी सत्य आहे हा माझा अनुभव आहे आणि तेच तर सगळे सिद्ध सांगतायंत !

३. तुम्हाला अध्यात्मात कणमात्र रस नाही आणि त्यातल्या कोणत्याही साधनाप्रणालीचा यात्किंचितही अनुभव नाही, त्यामुळे तुम्ही ब्रह्म नाही असा कितीही भारंभार प्रतिसाद लिहून सर्वथा निरर्थक प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केलात तर त्यात तुमचा वेळ आणि श्रम वाया जाण्यापालिकडे काहीही हाती लागणार नाही.