>> सोत्रिंनी माघार घेतली कारण जे लिहीलंय तो त्यांचा अनुभव नाही.

      ही खरी अज्ञानाची हद्द म्हणता येइल.  

माझा अनुभव किंवा अनुभूती ही फक्त मलाच ज्ञात असणार ती दुसऱ्याला कशी कळणार किंवा त्याची अनुभूती येणार. 

>>मी सत्य आहे हा माझा अनुभव आहे
ही तुमची अनुभूती आहे. कितीही भारंभार प्रतिवाद करून निरर्थक दावे करण्याचा प्रयत्न केलात तर त्यात तुमचा वेळ आणि श्रम वाया जाण्यापालिकडे काहीही हाती लागणार नाही कारण तुमची अनुभूती ही सर्वस्वी तुमची आणि वैयक्तिक आहे.

>> तेच तर सगळे सिद्ध सांगतायंत
सगळे सिद्ध, ज्ञान देतात, विनम्रपणे. ते स्वतःचा टेंभा मिरवत सगळ्या जगाला तुम्ही अज्ञानी आहात, तुम्हाला काही कळलं / कळणार नाही कारण जे समजायला हवं ते फक्त मलाच कळलं आहे, मला पाहा फुलं वाहा असं करत नाही. ते सकल जगाला ज्ञानी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांना शिष्य असतात.

- (विनम्र साधक) सोकाजी