जे समजायला हवं ते फक्त मलाच कळलं आहे, 

सोत्री - ही तुमची असेसमेंट  पार चुकीची आहे. वस्तुस्थिती अशी आहे -   जे मला कळलं आहे, तेच फक्त समजायला हवं आहे. 

अध्यात्मवाद्यांची ही नेहेमीचीच भूमिका आहे, कि माझ जे काही ज्ञान आहे, तेच फक्त सत्य आहे, व ते ज्ञानाची परिसीमा आहे. त्या पलिकडे काही ज्ञान असूच शकत नाही.  किंबहुना, असे ही म्हणता येईल कि अशी भूमिका घेता येणे, म्हणजेच अध्यात्म समजणे. 

तुम्हाला अध्यात्मात कणमात्र रस नाही आणि त्यातल्या कोणत्याही साधनाप्रणालीचा यात्किंचितही अनुभव नाही, 

संजय - हे मला उद्देशून होते, का सोत्रींना ? का दोघांना ? जरी मला उद्देशून लिहिले नसले, तरी आज पहिल्यांदा तुम्ही असे काही लिहिलेत जे अगदी बरोबर आहे, व मला १००% मान्य आहे. 

पण म्हणून मी त्या बद्दल लिहू शकत नाही, हा पुढचा निष्कर्ष मात्र चुकिचा आहे. कारण हाच जर तर्क असेल, कि एकाद्या विषया बाबत फक्त तीच व्यक्ती लिहू शकते ज्यात तिला रस आहे व त्याचा अनुभव आहे, तर मग चरस, गांजा, मारिज्युआना, . . .  (ईव्हन नरबळी, का नाही ?) या बद्दल फक्त तीच व्यक्ती लिहू शकेल जिला यात रस आहे व  या "साधनप्रणालिंचा" अनुभव आहे.  मानवजातीच्या सुदैवाने तसे नाही. जेव्हां या समाजातील काही विचारवंतांनी "सती जाणे" , विधवेचे विडंबण करणे, व इतर अनेक कु-प्रथांचा विरोध केला, तेव्हां (नशिबाने) कोणी त्यांना असे विचारले नाही, कि तुम्हाला सती जाण्याचा काय अनुभव आहे ?