१. सत्य आता आणि इथे आहे याची तुम्हाला कल्पनाच नाही! तुमच्या लेखनाचा सर्व रोख भविष्यात होणाऱ्या बदलावर आहे, यापरता  अज्ञानाचा रम्य देखावा काय असू शकतो ? 

२. अभिव्यक्तीवरून व्यक्तीचा अनुभव कळतो. जी काय विपश्यना तुम्ही केली असेल त्यानंतर सुद्धा तुमची भूमिका काय आहे ? तर ही निरंतर करायची साधना आहे. या निरंतरतेच्या दरम्यान पुन्हा संस्कार होणार त्यांची पुन्हा धुलई करायची, अशाप्रकारे अंघोळीसारखी साधना करून व्यक्ती कायम अंघोळच करत राहणार ! त्यात सिद्धतेची शक्यता शून्य. अर्थात, तुम्ही प्रतिसाद सुद्धा कॉपी / पेस्ट करतायं त्यामुळे मुद्दा लक्षात येणं कठीण दिसतं.