उन्हाळ्याचे दिवस होते. दोन तत्ववेत्ते (फिलोसोफर्स) एका नदीच्या काठावर उभे होते. नदीत पाण्यात मासे इकडून तिकडे खेळत होते.
फिलोसोफर 1 : ते मासे बघ. थंड पाण्यात खेळताना त्यांना कशी मजा येत आहे.
फिलोसोफर 2 : तू मासा नाहीस. म्हणून तुला याचा काहीही अनुभव नाही कि माश्यांना थंड पाण्या खेळताना कसे वाटते. म्हणून तू म्हणू शकत नाहीस की माश्यांना थंड पाण्यात खेळताना मजा येते का कसे.
फिलोसोफर 1 : तू मी नाहीस. म्हणून तुला याचा काहीही अनुभव नाही कि मला काय अनुभव आहे किंवा नाही. म्हणून तू असे म्हणू शकत नाहीस, की मी असे म्हणू शकत नाही, की माश्यांना थंड पाण्या खेळताना मजा येते का कसे.
फिलोसोफर 2 : अगदी बरोबर. मी तू नाही. म्हणून मला याचा काहीही अनुभव नाही की तुला काय अनुभव आहे किंवा नाही, आणि म्हणून मी असे म्हणू शकत नाही, की तू असे म्हणू शकत नाहीस, की माश्यांना थंड पाण्या खेळताना मजा येते का कसे. पण त्याच तर्काने, तू मासा नाहीस. म्हणून तुला याचा काहीही अनुभव नाही कि माश्यांना थंड पाण्या खेळताना कसे वाटते. म्हणून तू म्हणू शकत नाहीस की माश्यांना थंड पाण्यात खेळताना मजा येते का कसे.