बाकी जाऊ द्या पण आपल्या आंतर्जालीय मैत्रीला स्मरून सांगतो; आध्यात्मिक साधना हा रोखीचा व्यवहार आहे. साधनाकरता क्षणी आपण स्वतःशी जोडलं जायला हवं. दीर्घकालीन साधना आहेत वर्तणुकीत बदल घडवतात; स्वचा उलगडा करू शकत नाहीत. आणि परिस्थिती नेमकी विपरीत आहे; स्वचा उलगडा झाल्यावर वर्तणुकीत आपसूक फरक पडतो; वर्तणुकीतले बदल मृगजळासारखे आहेत; त्यांनी व्यक्तिमत्त्व सघन होत जातं पण स्व गवसत नाही. विपश्यनेत कधीही न सांगितलेली गोष्ट सांगतो; आपण दोन श्वासांमधल्या अंतरात आहोत, तस्मात, श्वासांवर अनुसंधान साधून काही उपयोग नाही.