फायनली एकदाची, क्रिया किंवा पद्धतीबद्दल बोललात त्याबद्दल सर्वप्रथम आभार!

'समोर पाहा आणि आजूबाजूला जे चाललंय ते ऐका ! '

१. हे एकदाच करायचे का आणि तसे असेल तर नेमकं कधी ? 
(कारण -> दीर्घकाल साधनेत व्यतीत केल्यावर, व्यक्तीला एकतर  झक मारत राग आवरावा तरी लागतो किंवा मग राग आला की गहन अपराधभाव दाटून येतो.)

२. समोर पाहा म्हणजे नेमके कुठे पाहायचे? बाह्यजगतातील भौतिक वस्तूंकडे पाहायचे का?

३. सर्वात महत्त्वचं - 
एखाद्या मन चलबिचल करणाऱ्या प्रसंगात, लक्ष दुसरीकडे वळणारे हे उपाय आणि तुम्ही मांडलेला उपाय ह्यात नेमका काय आणि कसा फरक आहे (शास्त्रियदृष्ट्या)? 

- (अभ्यासू) सोकाजी