व्हायला हवा हे उघड आहे. पण एखाद्याला अध्यात्मात रसच नसेल तर व्यावहारिक जगात व्यक्तिमत्त्व कणखर हवं.  आपल्याकडे एकतर उर्मटपणा बघायला मिळतो किंवा मग सदोदित बचावात्मक पवित्रा.  स्वतःचं व्यक्तिमत्त्व शानदार असल्यामुळे पाश्चात्य दुसऱ्याला पण तितकाच मान देतात.  त्यांच्याकडच्या अध्यात्मिक चर्चांचे विडिओ बघितले तर त्यांची पृच्छा अत्यंत प्रामाणिक असते आणि उत्तर देणाराही तितकंच समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे विचारणारे काय वाट्टेल ते विचारतात आणि अज्ञानी लोक उत्तरादाखल  फक्त पाठ केलेले उतारे फेकतात !