तिसऱ्या लेखात विचारलात आणि तेही नीट न वाचता; आता पुन्हा वाचा :
पहिलं सूत्र साधलं की मनाचा वाक हा पैलू निष्प्रभ होईल; याचाच परिणाम म्हणजे तुमचा श्राव्य हा पैलू कार्यरत होईल. आतापर्यंत जी मनाची अविरत बडबड ऐकू येत होती त्याऐवजी आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू यायला लागेल.
दुसरी गोष्ट साधली की मनाचा दृक हा पैलू निष्प्रभ होईल; निष्कारण दिसणारे चेहेरे, पुढच्या कामाची दृश्यं, याऐवजी फक्त सिग्रेट ओढणाऱ्या देहाची जाणीव राहील. सिग्रेटच्या कागदाचा स्पर्श, त्यातली उष्णता, धुराचा कंठाला होणारा स्पर्श, त्याचं तिथून खाली उतरणं, डोळ्यांना धुरामुळे होणारी सूक्ष्म जळजळ , स्वतःचा चेहरा आणि बसलेल्या किंवा उभं असलेल्या संपूर्ण देहाची स्थिती जाणवायला लागेल.
४) अशाप्रकारे एक आणि एकच काम करतांना, एका क्षणी तुम्हाला एका स्थिर स्थितीचं भान येईल जी सर्व कार्याला अंतर्बाह्य व्यापून आहे.
ही कर्मशून्य स्थिती हेच आपलं मूळ स्वरुप आहे, कारण स्वरूप कायम अकर्ता आहे.
२) समोर म्हणजे सरळ समोर पाहा. याची कारणमिमांसा आणि फलनिष्पत्ती त्याच लेखात आणि पुन्हा इथे दिली आहे.
३) तुम्ही वर्णन केलेले उपाय मनाचा निरास करू शकत नाहीत.
४) लेखात सांगितलेली साधना दुहेरी आहे. सिद्धाची नजर कायम समोर असते आणि मनाची बडबड थांबल्यानं त्याला आजूबाजूचं स्पष्ट ऐकू येत असतं. त्यामुळे एकदा निराकार दिसला की समोरचं स्वच्छ दिसणं आणि आजूबाजूचं ऐकू येणं हे नैसर्गिक होतं. एका झटक्यात तुम्हाला निराकार दिसू शकतो कारण तो कायम समोर आहे, त्यामुळे साधना किती वेळ करायची हा प्रश्न नाही; साधक सरळ समोर पाहयला किती वेळ घेणार हा प्रश्न आहे. !