मनाचे दृक आणि वाक हे दोन्ही मुख्य पैलू निष्प्रभ झाले आहेत; कायम समोर उभा ठाकलेला आणि सर्वस्व व्यापून असलेला निराकार दिसलेला आहे; मानसिकतेवर असलेला अध्यात्मिक मूढ कल्पनांचा पगडा दूर झालेला आहे; आपण व्यक्ती आहोत ही धारणा कायम झालेली आहे; ठामपणे स्वतःला जाणलं आहे; सत्याचा उलगडा झालेला आहे. सगळं काही झालेल आहे. आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे विषय संपलेला आहे. तुम्ही पण साधना केली असेलच, आणि तुमचं पण हे सगळं झालं असेलच. आता मला (किंवा तुम्हाला पण) आत्मपूजा उपनिषदाच्या चवथ्या (पाचव्या, . . दहाव्या, पन्नासाव्या) सूत्राची उकल करण्याची गरजच काय ?