उन्मेष

तुम्ही माझ्या प्रतिसादांना मूर्खपणा असे म्हंटले, मला कॉमन सेन्स  नाही असे सूचित केलेत, त्याचा मला अजिबात राग नाही. आठवड्याभरा पूर्वी राग आला असता, पण आता नाही. कारण आता मी राग, लोभ, द्वेष, या सर्वाच्या पलिकडे गेलो आहे. मी साधना केली आहे. वरकरणी अत्यंत सोपी वाटली तरी कमालीची प्रभावी . . . . आणि अत्यंत तर्कशुद्ध, अशी साधना केली आहे. "निश्चलं ज्ञानं आसनं" या सूत्राचा उलगडा मला झालेला आहे; आता मी ठामपणे स्वतःला जाणलं आहे आणि त्यावर स्थिर आहे. 

संजय क्षीरसागर जे काही लिहीत त्यावर पूर्वी मी आक्षेप घेत असे, त्याची खिल्ली उडवीत असे. व तेव्हां संजय पण माझ्या प्रतिसादाला प्रत्युत्तर देत असत. वाद वाढत असे. पण आता मी त्यांच्या सांगण्यानुसार साधना केल्या पासून चित्र एकदम पालटले आहे. मागच्या प्रतिसादात त्यांनी मला चक्क शाबासकी दिली. मी यत्ता तीन पास झाल्याने त्यांनी मला यत्ता चारचा प्रश्न टाकला. पण मी त्या प्रश्नाला हात घालणारच नाही. मला तीन यत्ता येवढे शिक्षण खूप झाले. मानसिकतेवर असलेला अध्यात्मिक मूढ कल्पनांचा पगडा दूर झालेला आहे; आपण व्यक्ती आहोत ही धारणा कायम झालेली आहे; ठामपणे स्वतःला जाणलं आहे; सत्याचा उलगडा  झालेला आहे. सगळं काही झालेल आहे. आता यत्ता चारचा अभ्यास करण्याची गरजच काय ?

संपादकांनी माझा प्रतिसाद संपादित का केला नाही, याचे उत्तर मी देऊ शकत नाही. मी काही त्यांच्या मनात डोकावून पाहू शकत नाही. एक शक्यता अशी आहे, की संपादकांनी पण तीच साधना करून पाहिली असावी. वरकरणी अत्यंत सोपी वाटली तरी कमालीची प्रभावी  . . . . आणि तरी सुद्धा अत्यंत तर्कशुद्ध; अशी ही साधना संपादकांनी पण केली असावी व त्यांना पण सत्याचा उलगडा  वगैरे झालेला असावा.

असो. तुम्ही संजय क्षीरसागर यांचे प्रशंसक आहात हे माझ्या लक्षात आलेले आहे. पण केवळ प्रशंसा करून थांबू नका. ते सांगतात तसे करा. साधना करा. वरकरणी अत्यंत सोपी वाटली तरी कमालीची प्रभावी . . . . आणि अत्यंत तर्कशुद्ध, अशी ती साधना, करा. दोन आउटकम संभाव्य आहेत.

1- तुम्हाला पण सत्याचा उलगडा वगैरे होईल. झाला, तर विषय संपला. 
2- तुम्हाला असे वाटेल के च्या***. . . हे सर्व फक्त शाब्दिक बुडबुडे होते. तसे झाले, तरी विषय संपला.

करा, व काय झाले ते सांगा.